जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी: 200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा : पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड व नंत...