Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

‘झिरो बजेट’ शेतीचा संकल्प

जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? याचा विचार आपण सातत्याने करीत होतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधनांकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही. निसर्गाचे मात्र शोषण झाले, असे सुभाष पाळेकर यांचे म्हणणे आहे. मुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’, अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे. आधुनिक पद्धतीने रासायनिक शेतीतून उत्पन्न वाढवायचे की, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारायचा, अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट’ नैसर्गि...

शेतीतच करणार करिअर

नारळ बागेत अंतरपिकांचे नियोजन

बेंदुर विशेष - बैलांची घ्या योग्य काळजी

जमीनिच्या प्रकारानुसार करा सीताफळ लागवड.

बटाटा - काढणी व साठवणूक - डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर व श्री. विरेंद्र चव्हाण, जळगाव

Amazon.in Widgets भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. आपल्या नेहमीच्या जेवणातील एक महत्वाचा घटक असणारे हे गहू , तांदूळ आणि मक्यानंतर जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाद्यान्न असून जगातील १३० देशात बटाट्याचे उत्पादन होते . बटाटा हे विकसित तथा विकसनशील देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे प्रमुख पीक आहे . महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे , सातारा , नाशिक , अहमदनगर , बीड , औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने , स्फुरद यासारखी खनिजे व ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणा मध्ये उपलब्ध असतात. वाढते शहरीकरण , वाढते उत्पन्न व त्यामुळे आलेली क्रयशक्ती या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत प्रक्रिया केलेल्या बटाट्याची मागणी सतत वाढत आहे . स्त्रियांच्या नोकरीवाढीमुळे व वाढत्या पर्यटनामुळे ही मागणी वाढतच राहणार आहे. अनेक उद्योजक व विदेशी कंपन्या या उद्योगात येत आहेत , बटाटा पिकाचे उत्पादन खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामा मध्ये जास्त येत असल्याचे संशोधनांमधून सिद्ध झालेले आहे. जमिनीचे तापमान १७ ते २० अंश से ल्शिअस दरम्यान असल...