Skip to main content

Posts

(Bhajipala suggetions)भाजीपाला सल्ला

- प्रा. सी. बी. बाचकर, डॉ. के. जी. शिंदे, डॉ. एम. एन. भालेकर * लसूण पातीसह काढून जुड्या बांधून सावलीत सुकवावा. * वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या बगलफुटी काढून टाकाव्यात व वेलांना मातीची भर द्यावी. वेलांना मंडप किंवा ताटीवर सुतळीवर आधार द्यावा. * वेलवर्गीय भाजीपाला पिकांना फुले येणाऱ्या व फळ पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. महाराष्ट्रात सध्या विषय हवामान चालू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन व पुन्हा सायंकाळी थंडी असे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांवर रस शोषणाऱ्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. * कांदा - कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फूलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी फवारणी (प्रतिलिटर पाणी) कार्बोसल्फान १ मिली किंवा फिप्रोनील १.५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन (१%) + ट्रायझोफॉस (३५%) (संयुक्त कीटकनाशक) २ मिली. टीप - वरील कीटकनाशकासोबत १ मिली स्टिकर मिसळावे. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली टीप - कीड व रोगांचा प्राद...

शेळ्यांची आनुवंशिकता, पैदासतंत्राला द्या समान महत्त्व

शेळ्यांपासून चांगल्या उत्पादनासाठी उत्तम व्यवस्थापन, आहार, वातावरणाबरोबरच जनावरांच्या अानुवंशिकतेला (जातिवंतपणाला) अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेळ्यांचे व्यवस्थापन, आहार, वातावरणासोबतच अानुवंशिकतेकडेही तेवढच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पैदास व आनुवंशिकता जनावराच्या आयुष्यात अगोदर येते व बाह्यव्यवस्थापन पैदाशीनंतर सुरू होते. त्यामुळे आनुवंशिकता कुठल्याही पशुपालन व्यवसायाचा पाया आहे. डॉ. तेजस शेंडे पशुपालन व्यवसायात पैदास व आनुवंशिकता या गोष्टींना म्हणावे तितके महत्त्व दिले जात नाही किंवा हे क्षेत्र दुर्लक्षित आहे. व्यवस्थापनातील इतर गोष्टी कितीही चांगल्या असतील अाणि पैदासच चांगली नसेल, तर या व्यवसायातून अपेक्षित फायदा मिळवणे कठीण जाते. पैदास ही जनावरांच्या शरीरवाढीचा वेग, चांगले मांस, करडांची जास्त संख्या, शेळीपासून पिले वेगळे करताना त्याची जास्त वजने, उत्तम प्रजनन, आनुवंशिक दोष, दूध उत्पादन, रोगप्रतिकारक शक्ती इ. गोष्टींवर अवलंबून असते. शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीकडे किंवा वेगवेगळ्या पैदाशीच्या पद्धती अवलंबण्याकडे शेतकऱ्यांमध्ये अनास्था आढळते. कारण बऱ्याच ...

Embryo Transfer Technology

Panchagavya

Panchagavya Organic Fertilizer and pesticide Ingredients: From Desi Cows – Only Fresh Cow Dung, Cow’s Urine, Cow’s Milk, Cow’s Curd, Cow’s Ghee, Sugar Cane Juice, Tender Coconut Water, Ripe Banana, Water Spray System: 3% Panchagavya Solution for all Crops. 30 ml of Panchagavya with 1 liter of Water = 3% Solution. 2% Panchagavya Solution for Crops like cucumber, mint, bottle gourd, snake gourd with soft leaves. 20ml of panchagavya with 1 liter of water = 2% Sollution Flow System: 10 Liters of panchagavya per acre once in 15 days. 3 % panchagavya solution to dip the seeds before drying and storing them Periodicity Pre Flowering Phase Once in 15 days, two sprays depending upon duration of crops Flowering and Pod setting Stage Once in 10 days, two sprays Fruit/pod maturation stage Once during pod maturation Time of application of Panchagavya for different crops is given as follows: Rice 10, 15, 30 and 50 days after transplanting Sunflower 30, 45 and 60 days after sowing ...

अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा बियाने मीळेल

अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा बियाने मीळेल *********** शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर,आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते. महाराष...

जाणून घ्या मटण निर्यातीचे निकष

शेळीपालन व्यवसायात जर फायदा वाढवायचा असेल तर स्थानिक बाजारपेठेतील विक्रीबरोबरच मटणाची निर्यात हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. निर्यातीमुळे स्थानिक बाजारपेठेत मटणाच्या विक्रीसाठी व दरासाठीची करावी लागणारी कसरत व धडपड कमी करता येते. डॉ. तेजस शेंडे भारत मटण मुख्यतः अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, कुवेत ओमान व इतर अशा जवळपास २५ देशांना निर्यात करतो. मटणाची किंवा कुठल्याही शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करायची असेल तर त्याला काही अटी व नियम पाळावे लागतात जे आयात करणाऱ्या देशाचे व भारत सरकारच्या निर्यात विभागाने प्रमाणित केलेले असतात. भारतात केंद्र शासनाअंतर्गत अपेडा (APEDA ः Agricultural and Processed Food Products Export Development Authority) नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या परवानगीशिवाय भारतामधून कुठल्याही शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करता येत नाही. या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे तर विभागीय उपशाखा महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. कुठल्याही मालाची निर्यात करायची असेल तर त्या मालाची अपेडा संस्थेत नोंदणी करणे अनिवार्य असते. बोकडाच्या मटणाच्या निर्यातीसाठी आवश्य...

🌳 *कृषिसमर्पण*

🌳 *कृषिसमर्पण* 🌳 🌏 *जमिनीतील पाणी शोधाच्या परंपरागत पद्धती* 🌏 भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे सा ठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात. _*- डॉ. शंकर उमाळे*_ जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते. जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते. भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते हे शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण ...