हिरवळीचे खते – सेंद्रिय शेतीमधील महत्त्वाचा घटक - डॉ. कु. सारिका वांद्रे, कोल्हापूर आणि डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती , झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत" असे म्हणतात. हिरवळीच्या खतांचे प्रकार : हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत . १) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते : हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग , मिश्र किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात. या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग , गवार , चवळी , धैं चा , मूग , मटकी , मेथी , लाख , मसूर , वाटाणा , उडीद , कुळीथ , सेंजी , शेवरी , लसु ण घास , बरसीम या पिकांचा समावेश असतो. २) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत : पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्...