Skip to main content

Posts

ठाणेकर तरुणाचा सेंद्रीय शेती प्रसाराचा ध्यास

जीवामृत

जीवामृत:प्रमाण 1 एकर साठी:          200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे . दिवसातून दोनदा सकाळ व   संध्याकाळ काठीने ढवळावे . महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली . जीवामृत दयावे . ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :   पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड   व नंत...

झिरो बजेट नैसर्गिक शेती कशी करायची जाणून घ्या इथे…..

(प्रतिनिधी):- नागपूर नॅचरल आणि झिरो बजेट आध्यात्मिक नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीच्या वतीने ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार ३ मेपासून करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाळेकर यांनी बोलतांना सांगितले की, “रासायनिक शेती, सेंद्रीय शेती ही शेतकऱ्यांना कर्जात बुडवणारी आहे. त्याप्रमाणे शेतीसाठी वापरण्यात येणारे ठिबक सिंचन हे सुद्धा धोकादायकच आहे. ठिबक सिंचनात पाणी सरळ झाडांना जातो त्यामुळे झाडांचे नुकसान होते. यापेक्षा तुषार सिंचन हे लाभदायक आहे. जे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करतात त्यांनी तो तातडीने थांबवावा.” असे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रांबद्दल सांगितले. नैसर्गिक शेतीत आच्छादन आणि वाफसा हे महत्त्वाचे घटक आहे, यामुळे ९० टक्के पाण्याची बचत होते. पिकांना, झाडांना आच्छादन हे अत्यंत आवश्यक आहे. मुळांना पाण्याची आवश्यकता नसते. ५० टक्के वाफ आणि ५० टक्के हवा ही मुळांसाठी आवश्यक असते...

प्रत्येक तालुक्‍यात महिन्याला झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे शिबिर

कोल्हापूर - जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात महिन्यातून एकदा झिरो बजेट नैसर्गिक शेती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही या शिबिराचे आयोजक सुधाकर पाटील यांनी दिली. तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत चालले आहे. याला एकच पर्याय म्हणजे सुभाष पाळेकर यांची शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हा आहे. या शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन स्वतः श्री. पाळेकर देशात तसेच परदेशात शिबिरांच्या माध्यमातून करत आहेत. देशातील तसेच परदेशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान कसे पोचवता येईल, या विचारातून कोल्हापुरात 24 ते 26 फेब्रुवारीअखेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‌घाटन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आध्यात्मिक मार्गदर्शक संजीव कुलकर्णी, तानाजी निकम, निवृत्त पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब गवाणी आदी उपस्थित होते. या शिबिरात 63 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. त्यात प्रत्येक ताल...

विषमुक्त झिरो बजेट शेतीची १६ वर्षे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरच्या बापूसाहेब गाडे यांनी 16 वर्षात रसायनांचे वाचवले 15 ते 20 लाख रुपये १ एकर ऊस शेती आणि गुळ निर्मितीतून एकरी ५ लाखांच्या नफा कमाईत यश

सबसे सरल व तेज तरीका जैविक खाद !! organic compost - Hindi/ urdu/ punjabi

44_जैविक कीटनाशक || Organic Pesticides

Organic Farming Zero Budget Farming Formula By Rajiv Dixit Ji

Zero Budget Natural Farming: Interview with Subhash Palekar

शेतीचे प्रकार

शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरुन शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तृहेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. का...

नैसर्गिक किटक नाशके

1. निमास्त्र : 1 एकरसाठी      200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि . देशी गार्इचे शेन + 10 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि . लींबोळी पावडर नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नये . पाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी . नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये . तयार झालेले द्रावण  तसेच फवारावे . हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवा . दिवसातून दोनदा ढवळा . 48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा . निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी  पांढरी माशी , मावा , तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही हे निमास्त्र ...