Skip to main content

Posts

नोटीस

ह्या ब्लॉग वरील सर्व संकलपना ह्या पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर यांच्या वेबसाईट व ब्लॉगवरील असुन आपण फक्त जास्तित-जास्त लोकांपर्यंत त्यांचा प्रसार होणेकरीता आपल्या ब्लॉगशी जोडणेचा प्रयत्न केला आहे. अधिक माहिती सा ठी क्लिक करा :

संकल्पना व मार्गदर्शन :-

कृषी - ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर संपर्क: पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर १९," चंदा स्मृती", जया कॉलनी, टेलिकॉम कॉलनी जवळ,साई नगर पोस्ट, अमरावती- ४४४६०७ (महाराष्ट्र) मो.न. 09423601004,9673162240, 9850352745   निर्मिति , संकल्पना , रचना   1)श्री केशव राहेगावकर नांदेड़ संपर्क :- ०९४२२१७०६६५/०९०९६९३०३४१ 2) श्री सुनील राठोड नांदेड़ संपर्क :- ०९८२२६३९०५३ 3) श्री सुरेश कुलकर्णी नांदेड़ संपर्क :- ०९२२६११८८३६/०८६९८३७२०९६ 4) श्री दीपक मोरताळे , नांदेड संपर्क:- ०९४२२१७४६४७

खरिप आणी हंगामी पिके

खरिप आणी हंगामी पिके 1.जमिनीची टॅ्रक्टरने खोल मशागत करू नये. टॅ्रक्टरने मशागत करणे आवश्यक असेल तर कल्टीवेटर किंवा रोटावेटरने मशागत करावी जेणे करून जमिनीची उलथापालथ  होणार नाही शेवटची वखरपाळी करण्याच्या आधी प्रती एकरी 200 ते 400 किलो घनजिवामृत विस्कटून टाका व अंतिम मशागतीने मातीमध्ये मिसळून टाका. जर पिकांची लागवण चौफुली पद्धतीने करायची असेल तर चौफुलीवर उपलब्धतेनुसार प्रत्येक फुलीवर एक मूठ किंवा एक ओंजळ  घनजिवामृत फुलीवर टाका जेणे करून बी टोकता येइल. चौफुल्या पाडताना सुरूवातीला उताराच्या दिशेने पाडा व नंतर आडव्या दिशेने पाडा. म्हणजे वाहून जानारा पाणी आडेल.व पावसाचे पाणी मुरेल.

बियाणे

शक्य असेल तर कोणत्याहि स्थीतीत गावरानी बीयाणे वापरावे. ते शक्य नसेल तर सुधारित बियाणे वापरावे. पण चुकूनही संकरित बियाणे किंवा बीटी बियाणे वापरू नका. जर आणिबानित गावरानी किंवा सुधारित बियाने उपलब्ध झाले नाही॰ व संकरीत बियान्याशीवाय कोणताही उपाय नाही अशा वेळेस बाजारामध्ये जे संकरीत बियाणे जास्त चालते ते संकरीत किंवा बीटी बियाणे पेरून त्या पेरलेल्या पिकातून सर्वोत्कृष्ट , रोगमुक्त, कीडमुक्त,जास्त उत्पादन देणारे झाडे निवडून त्याचे बियाणे निवडून , त्या निवडलेल्या झाडाचे बियाणे दरवर्षी पेरून अशी निवड ६ वर्षे करून आपल्याला संकरीत बियाण्याचे किंवा बीटी बियाण्याचे सुधारित किंवा देशी बियाण्यामध्ये रुपांतर करता येते .आपले बियाणे आपल्याला तयार करता येते . झिरो बजेट कृषी आंदोलनामध्ये काही गावे बीज ग्राम म्हणून विकसित करता येतील . व ते बियाणे अन्य नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करता येईल.

वाफसा व पाणी व्यवस्थापन

वाफसा पिकांच्या मुळांना पाणी पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे. तर पिकांच्या मुळींना वाफसा पाहिजे.उदाहरणात दुशकाळी पट्टयात पाऊस नसताना बिनासिंचनाच्या चिंचेच्या झाडाला अमाप चिंचा लागतात. 1. वाफसा म्हणजे काय ? जमिनीत दोन मातीकण समुहादरम्यान ज्या रिकाम्या पोकळया असतात त्या रिकाम्या पोकळयामध्ये पाण्याच अस्तीत्व अजीबात नको, तर 50% पाण्याची वाफ व 50% हवा ह्यांच संमिश्र पाहिजे. ह्याच स्थीतीला वाफसा म्हणतात. 2. वाफसा घेणारी मुळी कुठे असते ? कोणत्याहि झाडाची दुपारि बारा वाजता जी सावली पडते त्या सावलीच्या शेवटच्या सिमेवर अन्न आणि वाफसा घेणारी मुळी असते. ती त्या सावलीच्या आत नसते.झाडाच्या मुळीला किती प्रमाणात वाफसा पाहिजे हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुळींचा असतो आपला नसतो. दुपारि 12 वा. पडणाऱ्या  सावलीच्या कडेला जर अन्न व वाफसा घेणारी मुळी आहे, जर आपण  सावलीच्या सीमेवर पाणी दिले तर तो निर्णय आपला असतो. अशा स्थीतीत वाफसा होत नाही . परंतु जर आपन सावलीच्या सीमेच्या 6 इंच बाहेर पाणी दिले तर मुळी त्या पाण्यापर्यंत ज...