Skip to main content

Posts

नैसर्गिक किटक नाशके

1. निमास्त्र : 1 एकरसाठी      200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि . देशी गार्इचे शेन + 10 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि . लींबोळी पावडर नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नये . पाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी . नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये . तयार झालेले द्रावण  तसेच फवारावे . हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवा . दिवसातून दोनदा ढवळा . 48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा . निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी  पांढरी माशी , मावा , तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही हे निमास्त्र ...

दशपर्णी अर्क

200 लि . पाणी + 20 लि . देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. . ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी      हे मिश्रन चांगले ढवळा , व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि . तंबाखू पावडर + 1 कि . तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा . तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात      2 कि . कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि . करंजी ची पाने +      2 कि . सीताफळाची पाने + 2 कि . धोतऱ्यायाची पाने + 2 कि . येरंडीची...

सेंद्रिय ‘दशपर्णी’ अर्कामुळे कांदा उत्पादन खर्चात हजारो रुपयांची बचत

  चांदवडच्या शेतकऱ्यांस टंचाईतही शेती फायदेशीर फळे आणि पिकांवरील रासायनिक खते आणि कीड नाशकांचा अतिरेकी वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असताना या रासायनिकीकरणास पर्याय म्हणून सदैव टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवडसारख्या तालुक्यातील वाहेगाव साळ येथील प्रयोगशील शेतकरी निवृत्ती न्याहरकर यांनी सेंद्रिय ‘दशपर्णी अर्क’चा पर्याय पुढे आणला आहे. कोणतीही रासायनिक खते व औषधांचा वापर न करता निव्वळ सेंद्रिय पद्धतीने त्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले असून उत्पादन खर्चात १० ते १२ हजार रुपयांची बचत त्यामुळे झाली आहे. रासायनिक शेतीतून घेण्यात येणारी पिके आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या फळांकडे तसेच पिकांकडे शेतकरी वळू लागले आहेत. न्याहरकर यांनी संपूर्ण कांदा पिकासाठी सेंद्रिय पद्धत व औषधांचा वापर केला आहे. त्यासाठी त्यांना एकरी केवळ ५५० रुपयांपर्यंत खर्च आला असून उत्पादन खर्चात घट झाल्याने सेंद्रिय शेती फायद्याची ठरत असल्याचे मत न्याहरकर यांनी व्यक्त केले आहे. न्याहरकर यांनी कांदा शेतीसाठी दशपर्णी अर्कचा वापर ...

‘झिरो बजेट’ शेतीचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर

भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी आधुनिक पद्धतीने रासायनिक शेतीतून उत्पन्न वाढवायचे की, सेंद्रिय शेती मार्गाचा अवलंब करायचा, अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी संपूर्ण भारतभर धडपडत आहेत. ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय ? याचा उहापोह करण्यासाठी युवर स्टोरीने पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश : ७६ वर्षीय सुभाष पाळेकर झिरो बजट-नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आजही महिन्याचे २५ दिवस भारतभ्रमंती करतात, शेत...